दिल्ली : भाजपा नेते सुब्रमन्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल नक्षलवादी आहेत असे वक्तव्य केले आहे. केजरिवाल सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात उपोषणाला बसले आहेत. अधिकार्यांच्या संपामधे मोदींचा हात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला अाहे. दरम्यान वेगवेगळ्या चार राज्यांचे मुख्यमंत्री असलेले ममता बॅनर्जी, चंन्द्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी केजरीवाल यांना भेटण्याकरता राज्यपालांच्या निवासस्थानी गेले असता त्यांना भेट नाकारण्यात आली. परिणामी त्यांनी केजरीवाल यांच्या पत्नींची भेट घेऊन केजरीवाल यांना आपला पाठींबा दर्शवला. ममता बॅनर्जी, चंन्द्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरिवाल यांचे समर्थन का करत आहेत? असा सवाल करत अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचे सनसनाटी वक्तव्य केले. ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमधे घटनात्मक संकट उभे राहीले असल्याचा आरोप केला तसेच यामुळे दिल्लीवासीयांचे नुकसान होत असल्याचे म्हटले. गेले चार महीणे राज्यातील कामकाज ठप्प असून लोकशाहीत अशी परिस्थिती चिंताजनक आहे असेही त्या म्हणाल्या.