पुणे प्रतिनिधी |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.
सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात असल्याची टीका केली आहे. त्या जबाबदार व्यक्ती असून त्यांच्याकडून अश्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती असे ही चव्हाण म्हणाले आहेत. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषद बोलत होते.
यावेळी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आल्यानंतर त्यांनी आर्थिक मंदीवर बोलणं अपेक्षित होते. मात्र ते बोलले नाहीत.’ अशी टीका हि त्यांनी केली आहे. दरम्यान आघाडीच्या जागा वाटपावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस १२५ पेक्षा अधिक जागा लढवणार आहे असे मिटिंग मध्ये ठरले असून पाच ते सहा जागा अदली बदली होणार आहे. काही जागा आम्ही मित्र पक्ष यांना सोडणार आहे. असेही त्यांनी सांगतिले आहे.