आणि भर लोकसभेत राहुल गांधींनी मारली मोदींना मिठी | लोकसभा Live

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. लोकसभेत अविश्वासाच्या ठरावावरील भाषणात राहुल गांधींनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. माझ्या डोळ्यात डोळे घालून पंतप्रधान बोलू शकत नाहीत असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत असे ही ते म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल गांधी उपरोधकपणे संघ आणि भाजपाला उद्देशून, ‘हिंदू धर्म काय असतो हे तुम्ही मला शिकवले, महादेव कोण आहे हे तुम्ही मला शिकवले, राम कोण आहे हे तुम्ही मला शिकवले’ असे उद्गार काढले. तुम्ही मला शिव्या द्या, मला पप्पू म्हणा, मी तुमचा द्वेष करणार नाही. मी तुमच्यामधील द्वेषाला बाहेर काढून त्याला प्रेमात परिवर्तित करेन. माझ्या मनात तुमच्या बद्दल फक्त प्रेम आहे’ असे म्हणून राहुल यांनी भाषण संपवले. थेट पंतप्रधानांचे आसन गाठून पंतप्रधानांना राहुल गांधी यांनी मिठी मारली.
राहुल गांधींनी केलेले घणाघाती भाषणाने विरोधकांना चेव चढला होता परंतु भाषणानंतर केलेल्या बालिश वृत्तीने सगळेच निराश झाले. कॉग्रेसच्या सदस्यांनी नाईलाजाने राहुल गांधींसाठी बाक वाजवले.

Leave a Comment