आता घरीच बनवा केएफसीचा ‘चिकन पाॅपकार्न’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | चिकन पाॅपकार्न खायचं झाल की आपण नेहमी केएफसी कडे धाव घेतो. परंतु घरी बनवलेले चिकन पाॅपकार्न हे केएफसी पेक्षा उत्तम आणि चविष्ट वाटतात. हे बनवायला अगदी सोप्पे आणि स्वस्त आहेत. तर मघ करून पाहणार ना??

साहित्य –

  • बोनलेस चिकन(तुकडे)
  • २ टेस्पून मैदा
  • १ टेस्पून काळेमिरं पावडर
  • १ टेस्पून तिखट
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १ टेस्पून धनिया पावडर
  • मीठ चवीप्रमाणे
  • १ टेस्पून आलं लसून पेस्ट
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तंदुरी कलर

कृती – एका भांड्यात वरील सर्व सामग्री एकजीव करून घ्यावी. नंतर तेल तापायला ठेवावे. तेल चांगले तापले की मघ चिकनला तळून घ्यावे. सर्व चिकनचे तुकडे सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. गरमागरम चिकन पाॅपकार्न टोमॅटो केचअप सोबत सर्व्ह करावे.