नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नवीन वर्षात ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयने नवीन वर्षात नवीन पेमेंट पद्धत आणली आहे. या पेमेंट पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जवळील पैसे देण्यासाठी पैसे(रोख रक्कम) किंवा डेबिट, क्रेडिट कार्ड नसल्यास आपण फिंगरप्रिंटच्या मदतीने पेमेंट करू शकतो. यासाठी बँकेने BHIM Aadhaar SBI अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहक केवळ आधार क्रमांकाद्वारे पैसे देऊ शकतात. हे अॅप ग्राहकांना डाऊनलोड करण्याची गरज नाही. दुकानदार, व्यापारी यांना हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. एसबीआयने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
नोंदणी करावी लागेल-
दुकानदारास या अॅपवर स्वत: ची नोंदणी करावी लागेल. यासाठी, नाव, पत्ता, फोन नंबर, आधार क्रमांक आणि व्यवसायाशी संबंधित माहिती आणि ज्या बँक खात्यात त्यांना पैसे प्राप्त करायचे आहेत, त्यांची निवड करावी लागेल. हे खाते आधारशी जोडावे लागेल. नोंदणीनंतर, दुकानदारास ग्राहकाचे फिंगरप्रिंट घेण्यासाठी एसटीक्यूसी प्रमाणित एफपी स्कॅनर आवश्यक असेल. हे स्कॅनर अँड्रॉइड मोबाइलशी कनेक्ट करावे लागेल.
असे होईल पेमेंट
प्रत्येक खरेदीनंतर, आपल्याला फक्त आपल्या बँकेचे नाव निवडून आधार नंबर, पेमेंट करण्याची रक्कम दुकानदाराच्या मोबाईलमध्ये एंटर करावी लागेल. तसेच आपल्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्कॅन करून पेमेंट अधिकृत करावे लागेल.यानंतर, आपली पेमेंट केलेली रक्कम थेट तुमच्या दुकानदाराच्या खात्यावर हस्तांतरित केले जाईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एसएमएसही मिळेल.
गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध
BHIM Aadhaar SBI अॅप अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ओएस v 4.2-जेली बीन मध्ये ओटीजी सह Android मोबाईलला समर्थन देते. या अॅपची गरज दुकानदार / व्यापारी / व्यापारी / छोटे व्यापारी यांना असेल. ग्राहकांना हे अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.