आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत 1,40,000 पशुपालकांची फार्म भरले आहेत. पशुपालक हे आपल्या इच्छेनुसार हे क्रेडिट कार्ड बनवू शकतात. एका गायीसाठी 40,783 रुपये तर म्हशीसाठी 60,249 रुपये इतके कर्ज दिले जाईल.

कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
इच्छुक पशुपालक किंवा शेतकर्‍यांना हे पशुधन क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी बँकेमार्फत केवायसी करावी लागेल.

केवायसीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल.

आपल्याला आपल्या बँकेत जाऊन एक अर्ज करावा लागेल. या अर्जाच्या पडताळणीनंतर, आपले पशुधन क्रेडिट कार्ड हे 1 महिन्याच्या आत तयार केले जाईल.

जमीन गहाण ठेवण्याची गरज नाहीः मुख्यमंत्री
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी कोणत्याही शेतकर्‍याबरोबर किंवा बँकेबरोबर कराराच्या शेतीत आपल्या उत्पादनावर ई-करार करू शकतात. आता कर्जासाठी त्याला आपली जमीन तारण ठेवण्याची गरज भासणार नाही.

मिळकत दुप्पट करण्याचे उद्दीष्ट साध्य करेल
मनोहर लाल म्हणाले, सन 2022 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मागील दोन वर्षांपासून पिके पेरणीपूर्वी किमान आधारभूत किंमत (एमएसपी-किमान समर्थन किंमत) जाहीर केले आहे. याद्वारे शेतकरी आपल्या इच्छेनुसार पेरणी करण्याचा विचार करू शकतो.

– संपूर्ण राज्यात 70 लाख एकर क्षेत्रासाठी दर तीन वर्षांनी आरोग्य कार्ड दिले जातील, जेणेकरून शेतकरी त्यानुसार पेरणी करू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment