आपचा आमदार फुटला, राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, दिल्ली अभी दूर नहीं…

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आम आदमी पक्षावर नाराज असलेले आमदार फतेह सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कमांडो सुरिंदर सिंह यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत आमदार फतेहसिंह आणि कमांडो सुरिंदरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी दिल्ली अभी दूर नहीं…असे ट्विट करत भविष्यात दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकविण्याचा निर्धारच जणू व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले की, दिल्ली अभी दूर नहीं…राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक विचार आहे आणि या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहेत. हा वटवृक्ष आणखी बहरो! आमदार फतेह सिंह व कमांडो सुरिंदर सिंह यांचे पक्षात स्वागत!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित असून विविध राज्यत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाग घेत आला आहे. नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार निवडून आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात देखील उतरला आहे. पक्षाकडून ७ उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवणार आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here