हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची आयपीएल मधील कामगिरी साधारण राहिली आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात तीन वेळा पोहचूनही विजेतेपद पटकावू शकला नाही. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या संघाला अद्याप निराशा हाती लागली आहे. परंतु या वर्षी कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारखे धुरंधर खेळाडू आरसीबीला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेताहेत. यासाठी वाटेल ती भूमिका बजावण्यासाठी ते तयार आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) फलंदाज एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी आपण फलंदाजीसह गोलंदाजी करण्यासही तयार आहे. गरज भासल्यास संघासाठी गोलंदाजी करण्यासही तयार असल्याचे त्याने संघाचा कर्णधार विराट कोहलीला सांगितले आहे.
तो म्हणाला की, ‘या हंगामात आमच्याकडे जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही संघाला पराभूत करण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. आमच्याकडे अॅरोन फिंच, मोईन अली, अॅडम जंपा सारखे खेळाडू आहेत.
यापूर्वी 3 वेळा फायनलला जाऊनही आरसीबीच्या नशिबी पराभवच –
कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) 21 सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. आरसीबीने आयपीएलच्या 12 हंगामांपैकी तीन वेळा (2009, 2011 आणि 2016) अंतिम सामने खेळले आहेत. पण प्रत्येकवेळी त्यांना अपयश आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’