चंदेरी दुनिया । मिस्टर परफेक्शनिस्ट (Mr Perfectionist) अशी ओळख असणारा आमिर खान आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. अमिर खानने (Aamir Khan) आतापर्यंत अनेक दमदार सिनेमे केले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असतो. त्यामुळे त्याचे प्रत्येक चित्रपट हीट ठरतात. आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्याच्या यादीतमध्ये आमिर खानचा समावेश झाला आहे.
आमिर खान बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिर खान आता एका उत्पादनांच्या जाहिरातींसाठी तब्बल 11 कोटी रुपये इतके मानधन घेतो. तसेच तो चित्रपटासाठी मानधनापेक्षा प्रॉफिट शेअरिंगला प्राधान्य देतो. आमिर खान एखाद्या फिल्मच्या प्रॉफिटमध्ये 70 टक्के हिस्सा घेतो.
आमिर खान हा एक उत्तम अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. 1973 साली आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर 1984 सालच्या ‘होली’ या चित्रपटामध्येही महत्त्वाची भूमिका केली आहे. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर आमिरने दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. 2012 मध्ये त्याने ‘सत्यमेव जयते’ या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.