प्रतिभासंपन्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी उलगडला आपला जीवनप्रवास

Anubhav Sinha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तुम बिन’, ‘थप्पड’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’, ‘कॅश’, ‘रावण’ या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याशी युवा दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मास्टर क्लासमध्ये संवाद साधला. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक … Read more

रणवीर कपूरचा ‘Animal’ पडला ‘Tiger 3’ वर भारी; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Animal Vs Tiger 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी अनेक चित्रपट येत असतात. त्यातले काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. मागील काही दिवसापासून अभिनेता रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला ‘A’ दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. असे असताना हा चित्रपट सर्वात आधी अमेरिकेत प्रदर्शीत करण्यात आला. अमेरिकेत या चित्रपटाने चांगली कमाई केली असून सलमान … Read more

‘किंग खान’ची जादू अजूनही कायम; जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 800 कोटींच्या पार

Jawan's box office collection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आलेला प्रत्येक चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहतो. तसेच प्रत्येक चित्रपटाची कथा ही काही हटकेच असते. तशीच सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडणाऱ्या जवानची (Jawan Movie) आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जवान धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. ७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या ‘जवान’ने 11व्या दिवशीही तब्बल 34.5 कोटींची भरभक्कम कमाई … Read more

Jawan Movie Review | मुर्दाड, जुलमी व्यवस्थेला जाब विचारणारा लढवय्या ‘जवान’

Jawan Movie Review

योगेश जगताप | तुम्हाला खरं सांगू? तुम्ही याला माझा अहंकार म्हणाल किंवा इतर काही..पण बॉलिवूड इंडस्ट्रीचा मी शेवटचा सुपरस्टार आहे. अनुपम खेर यांच्या एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीतलं शाहरुख खानचं (Shahrukh Khan)  हे वाक्य. कोरोना संकटानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आलेली मरगळ घालवण्याचं काम यंदाच्या वर्षी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने केलं. तोच कित्ता गिरवत नुकत्याच प्रदर्शित … Read more

एकता कपूरने रचला इतिहास!! आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली

Ekta Kapoor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची कंटेंट क्वीन आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शन पॉवरहाऊस ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सह-संस्थापक एकता कपूरला (Ekta Kapoor)2023 चा इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट (Emmy Award) अवॉर्ड मिळणार असल्याची घोषणा ‘इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स’ चे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल पासनर यांनी 29 ऑगस्ट रोजी केली. हा पुरस्कार एकता कपूरला 20 नोव्हेंबर 2023 रोजी … Read more

बवाल, रॉकी और राणी की प्रेमकहानी सिनेमांमुळे प्रेक्षकांची निराशा? फेसबूक पोस्ट चर्चेत

movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूडमध्ये नुकतेच दोन महत्त्वाच्या दिग्दर्शकांचे सिनेमे प्रदर्शित करण्यात आले आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बवाल आणि दिग्दर्शक करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेमकहानी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुख्य म्हणजे, अनेकांना हे सिनेमे आवडले आहेत. तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. सध्या अशीच फेसबुक माध्यमावर करण्यात आलेले टीका … Read more

नितीन देसाईंच्या जाण्याने 300 तरुणांवर बेरोजगारीची वेळ; ND स्टुडिओतील कर्मचाऱ्यांवर मोठे संकट

nitin desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीन देसाई यांनी अचानकपणे आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्यामुळे याचा धक्का सर्वांनाच बसला आहे. 2 ऑगस्ट रोजी देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या स्टुडिओला त्यांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने उभे केले … Read more

नितीन देसाईंचा पोस्ट मॉर्टम अहवाल समोर; मृत्यूचे कारण आले उघडकीस

nitin desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या ( Suicide) करून आपले जीवन संपवून घेतले. कर्जत येथे असलेल्या त्यांच्याच एन डी स्टुडिओत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितिन देसाई यांनी अचानक आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत देखील खळबळ उडाली. या सगळ्यात कालपासून त्यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लाविण्यात येत … Read more

‘लालबागच्या राजा’चा दरबार कोण उभारणार..? नितीन देसाई साकारणार होते ‘राज्याभिषेकाचा देखावा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या 48 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मुंबईतील लालबागनगरीत गणेशोत्सवाचा दरवर्षी वेगळाच थाट पहायला मिळतो. लालबागच्या राजाचे भक्त दूरवरून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. अशाच लालबागच्या राजाच्या एका निस्सीम भक्ताला आज देवाज्ञा झाली आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचा भव्य सेट साकारणाऱ्या नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. नितीन देसाई … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन; 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झालं आहे. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदी यांच्या नातीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार पाहायला मीळत होता. सुलोचना दीदींच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला … Read more