आयपीएलच्या ‘या’ चीनी कनेक्शनमुळे चाहते नाराज,केली बहिष्काराची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रिकेटमधील सर्वात प्रसिध्द लीग असलेली इंडीयन प्रिमियम लीग यंदा होणार हे आता स्पष्ट झालंय. पण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ची आडमुठेपणाची भुमिका पाहता यावर बहिष्काराची मागणी होतेय. कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२० सप्टेंबरमध्ये होणार आहे. परंतु बीसीसीआयने चीनी कंपनीसोबत करार तोडण्यास नकार दिल्याने चाहत्यांचा रोष ओढवून घेतलाय. त्यामुळे आयपीएलवर सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नाराजीचे सावट आहे. अनेकांनी सोशल मीडियात आपली नाराजी व्यक्त करत बहिष्काराची मागणी केली. 

लडाखमधील चीनी सैन्याची घुसखोरी आणि हिंसेनंतर चीन विरोधात देशभरात अभियान सुरु झाले. सरकारने देखील अनेक चीनी कंपन्यांवर बहिष्कार टाकला. अशात बीसीसीआय देखील विवो मोबाईलशी आपलं नातं तोडेल अशी आशा होती. पण तसे होताना दिसत नाही. चीनी कंपनी विवो आयपीएलचे टायटल प्रायोजक आहेत. बोर्डाने देशहितापेक्षा आपल्या जाहीरातदारास प्राधान्य दिल्याची टीका सोशल मीडियात होतेय. त्यामुळे सोशल मीडिया #Boycott IPL अभियान सुरु झालंय. 

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्सनी यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिलंय. बीसीसीआयने विवोसोबतचं नातं न तोडणं हे अस दर्शवत आहे की पैसाच त्यांच्यासाठी सर्वकाही आहे असे कन्फेडरेशनचे म्हणणं आहे. आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होईल. यावेळी स्पर्धा युएईमध्ये होईल. दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे मॅच खेळल्या जातील.

२०१८ नंतर बोर्डाला मीडिया राइट्समधून साधारण आयएनर ३,३०० कोटी मिळाले. तर प्रायोजकांमार्फत ७०० कोटी मिळाले. विवो दरवर्षी टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयला ४४० कोटी देतो. पण हे सर्वकाही बीसीसीआयला मिळत नाही.