हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमियर लीगबद्दल उत्सुकता वाढत आहे. या स्पर्धेची सुरूवात जवळ आली असतानाच संघाशी संबंधित गोष्टीही आता समोर येऊ लागल्या आहेत. यापूर्वी,अशी माहिती मिळाली होती की या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू खेळण्याबाबत शंका आहे, परंतु आता अशी बातमी समोर येत आहे की या दोन्ही देशाचे खेळाडू पहिल्या सामन्यापासून खेळू शकतात.
युएईमध्ये 1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचे परदेशी खेळाडू पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असल्याचे समजते. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा महाग वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि 2019 आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन यांचं नाव आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या वन डे मालिकेचा भारतीय प्रीमियर लीग संघांवर परिणाम होण्याची शक्यता होती पण तो मार्ग मोकळा झाला आहे.
केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी म्हटले आहे, की आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून इयन मॉर्गन आणि पॅट कमिन्स हे संघात असतील. केकेआर आपला पहिला सामना 23 सप्टेंबरला खेळणार आहे. कारण अबू धाबी सरकारने 14 दिवसांच्या क्वारंटाईन वेळ कमी करत केवळ सहा दिवसांचा केला आहे. म्हैसूर म्हणाले की ते 17सप्टेंबरला येथे दाखल होतील, परंतु आपला पहिला सामना 23 सप्टेंबरला खेळायचा आहे आणि यावेळी सहा दिवसांची क्वारंटाईन ची मुदतही संपेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’