आयपीएल 2020 : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा घालू शकतो ‘या’ मोठ्या विक्रमांना गवसणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये मुंबईचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा आपली टीम मुंबई इंडिअन्सला चॅम्पियन करण्याचा प्रयत्न करेल. मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत सर्वाधिक 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकला आहे. रोहित हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या चाहत्यांना यावेळीही रोहितकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. आयपीएल 2020 मध्ये रोहित काही मोठे विक्रम नोंदविण्यात यशस्वी होऊ शकतो. रोहित आयपीएलमध्ये १०२ धावा करण्यास यशस्वी ठरला तर आयपीएल कारकीर्दीत तो 5000 धावा पूर्ण करेल.अशी कामगिरी करणारा रोहित आयपीएलच्या इतिहासातील तिसरा फलंदाज बनेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत सुरेश रैना आणि विराट कोहली यांनी 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. या वेळी रोहितही या विशेष यादीमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होणार आहे.

मुंबई इंडियन्सकडून 4000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरणार रोहित शर्मा

272 धावा काढल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून 4000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. त्याचबरोबर 7 षटकार ठोकताच मुंबईकडून सर्वाधिक 150 षटकार ठोकणारा रोहित पहिला क्रिकेटपटू ठरेल.

सहा षटकार मारताच रोहित पूर्ण करेल आयपीएल मधील षटकारांचे द्विशतक

आयपीएल २०२० मध्ये रोहितने सहा षटकार लगावता तो आयपीएलमध्ये २०० षटकार ठोकणारा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या अगोदर ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि एमएस धोनी यांनी आयपीएलमध्ये २०० किंवा त्याहून अधिक षटकारांचा विक्रम केला आहे.

गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत, आतापर्यंत त्याच्या नावावर 125 सामन्यांत एकूण 326 षटकार आहेत. तर एबी ने आयपीएलमध्ये एकूण 212 षटकार ठोकले आहेत, तर धोनीने आयपीएल कारकीर्दीत 209 षटकार लगावले आहेत. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये 194 षटकार नोंदवले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’