आरोग्यासाठी पारिजातकाचे फुल आहे अधिक उपयुक्त ; जाणून घेऊया पारिजातकाचे जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पारिजातकाचे फुल हे दिसायला जरी सुंदर असले तरी त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. या पानांचा तसेच त्याच्या फांद्यांचा खूप औषधी गुणधर्म आहेत. या पानाचा वापर चहा बनवण्यासाठी वापर केला जातो. तुम्ही या पानांपासून बनविलेल्या चहा प्यायला आहात ? कधी पारिजातकाच्या पानाचा चहा बनतो ते पण सांगता येणार नाही. यांचा फुलं, बियाणं किंवा सालींचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी अनेक फायदेशीर आहे पारिजातकाच्या फुलांपासून पानं, साली आणि बियाणं उपयुक्त आहे.

चहा बनविण्याची पद्धत –
पारिजातकाचा चहा बनविण्यासाठी याचे दोन पानं आणि एक फुलासह तुळशीची पान घेऊन १ ग्लास पाण्यात उकळवून घ्या. उकळल्यावर गाळून थंड करून किंवा कोमट पिऊन घ्या. चवीनुसार मध किंवा खडी साखर देखील घालू शकता. हे खोकल्यासाठी फायदेशीर आहे.पारिजातकाची २ पाने आणि ४ फुलांना ५ ते ६ कप पाण्यात उकळवून, ५ कप चहा सहज बनवू शकतो. हे उत्साह वाढवतं.

सांधे दुखी – पारिजातकाचे ६ पाने तोडून बारीक वाटून घ्या. त्यामध्ये काही प्रमाणात पाणी टाकून ते चांगले वाटून घ्या . या वाटून झालेल्या पेस्टला पाण्यात घालून पाण्याची मात्रा कमी होण्यापर्यंत उकळवून घ्या आणि थंड करून दररोज सकाळी अनोश्यापोटी प्यावं. नियमाने असे केल्यास सांध्यांशी निगडित इतर समस्या नाहीश्या होतील.

खोकला – जसे खोकल्यासाठी तुळशीचे पण उपयुक्त असते. त्याच पद्धतीने खोकला आणि कोरड्या खोकल्यासाठी पारिजातकाच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा होतो. याला साधारण चहामध्ये उकळवून किंवा बारीक वाटून मधासह देखील घेऊ शकता. त्याच्या दररोज च्या सेवनाने खोकला हा पूर्णतः नाहीसा होतो.

ताप – आपल्याला थंडीच्या दिवसात हवामान बदलल्याने अनेक वेळा ताप येतो त्यावेळी कोणत्याही प्रकाराचा ताप असल्यास पारिजातकाच्या पानांचा चहा पिणं खूप फायदेशीर असतं. डेंग्यूच्या तपासून ते मलेरिया किंवा चिकनगुनियापर्यंत कोणत्याही तापाचा नायनाट करण्याची क्षमता यामध्ये असते.

सायटिका – दोन कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे ८ ते १० पानं मंद आंचेवर अर्ध होईपर्यंत उकळावे. थंड करून सकाळ संध्याकाळ अनोश्या पोटी प्यावं. एका आठवड्यात नक्की आपणास फरक जाणवेल.

मूळव्याध – पारिजातकाची पानं मूळव्याध किंवा पाईल्स साठी एक चांगले औषध मानले जाते. या साठी पारिजातकाच्या बियाणं घेणं किंवा त्याची पेस्ट बनवून त्या जागीस लावल्याने फायदेशीर असतं. मूळव्याध हा आजार खूप भयंकर असतो. ज्या त्या वेळी त्याची काळजी नाही घेतली तर त्याचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला सुरुवात होते.
त्वचेसाठी – पारिजातकाची पाने वाटून लावल्याने त्वचेशी निगडित त्रास नाहीसे होतात. याचा फुलाची पेस्ट बनवून लावल्याने चेहरा उजळ आणि चमकदार होतो.

हृदय रोग – हृदयाच्या आजारामध्ये पारिजातकाचे वापर फायदेशीर असतं. याचा १५ ते २० फुलांच्या रसाचे सेवन केल्याने हृदयाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

Leave a Comment