हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या सोशल मीडियामध्ये एका सोनेरी रंगाच्या कासवाचा फोटो प्रचंड वायरल झाला आहे. ते कासव पहिल्यांदाच अश्या कलरचे कासव पृथ्वीवर मिळाले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कासव हे जन्मांपासून ते मृत्यूपर्यंत कमीत कमी २० वर्षापर्यंत जगते. जास्तीत जास्त ते १०० वर्षापर्यंत सुद्धा जगू शकते. या कासवाचा रंग हा सोनेरी आहे म्हणून त्याला पाहण्यासाठी अनेक लोक रांगेत उभे आहेत. काही जण या कासवाला देव विष्णू याचा अवतार समजतात.
मिथिला विल्डलाइफ ट्रस्ट ने या कासवाची जात भारतीय असल्याचे म्हंटले आहे. तसेच त्याची जात होई लाँप्प प्रकारची आहे. हा कासव नेपाळ मध्ये सापडला आहे. वन्यजीव तज्ञ् कमल देवोटा म्हणाले आहेत कि, नेपाळ मध्ये धार्मिक कार्य तसेच शुभ कार्य करायचे असेल तर कासव या प्राण्याला जास्त महत्व दिले जाते. काही लोकांचे म्हणणे आहे कि भगवान विष्णू यांनी पृथ्वीला वाचवण्यासाठी कासवाच्या रूपाने जन्म घेतला आहे. हिंदू धर्मानुसार कासवाच्या वरच्या भागाला आकाश असे म्हंटल जाते. तसेच खालचा भाग हा पृथ्वी समजले जाते.
अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार कासवाच्या जीन मध्ये काही बद्धल झाले असतील त्यामुळे या कासवाचा रंग हा बदलला आहे. नेपाळमध्ये या पूर्वी विशेष पाच वेगवेगळे कासव आढळले होते. परंतु सोनेरी रंगाचा कासव हा पहिल्यांदा आढळला आहे. त्यामुळे त्या भागात विशेष मह्त्व दिले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’