आसामला आले छावणीचे स्वरूप. ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ ची यादी आज होणार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुवाहाटी | आसाम मधील बांगलादेशी घूसखोरी हा अनेक दशकापासून चालत आलेला प्रश्न आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ (एन.आर.सी.) ची स्थापना करण्यात आली आहे. एन.आर.सी. आपली पहिली यादी आज जाहीर करणार आहे. या संस्थेचा दावा आहे की एकट्या आसाम राज्यात ४० लाख घूसखोर आहेत.

२.८० कोटी लोकसंख्या असलेल्या आसाम मध्ये घूसखोरांची संख्या वाढत गेल्याने त्यावर तोडगा म्हणून एनअारसी ची स्थापना करण्यात आली होती. १९५१ साली आशा प्रकारची यादी पहिल्यांदा बनवण्यात आली होती. सध्या कार्यरत असलेल्या एनअारसी ने १९७१ हे साल मूल नागरिकत्वाचे प्रमाण मानले आहे. १९७१ पूर्वीचा आसाम रहिवासाचा पुरावा नागरिकांना समिती पुढे सादर करावा लागला आहे. त्यानुसार ही यादी बनवण्यात आली आहे. ३० ऑगस्ट पर्यंत ही यादी एनअारसी च्या विविध केंद्रावर प्रकाशित केली जाणार आहे. ज्यांच्या नागरिकत्वाची अडचण आहे त्यांनी आपले नागरिकत्व ३० ऑगस्ट पूर्वी समितीसमोर सादर करायचे आहे.
‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ ची यादी जाहीर होताच राज्यात हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याने राज्यात सीआरपीएफच्या २२० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment