इंदिरा गांधी स्टेडियम शरद पवारांनीच बांधलं का ? अमित शहा यांच्या सवालावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | मैदान ही खेळाडूंच्या खेळासाठी बांधली जातात. मात्र सध्या महाराष्ट्रात याच मैदानावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगू लागला आहे. असाच एक विकास कामांचा खडा सवाल देशाचे गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांना विचारला आहे. महाजानदेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील सांगता सभेत केंद्रिय गृह मंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर कडकडून टीका केली.

राजकारणात आरोप प्रत्यारोप होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला काही नवीन नाही. पण ज्या ‘इंदिरा गांधी स्टेडीयम’वर उभा राहून गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांना विकास कामांचा सवाल केला, त्या स्टेडियमचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे. राष्ट्रवादीच्या मंडळींकडून सांगितलं जात की हे स्टेडियम पवारांच्या प्रयत्नातून साकार झालं. तर भाजपवाले म्हणतात स्टेडियमच श्रेय पवारांनी घेऊ नये. तसेच सोशल मीडियावर अमित शहांच्या टीकेला चांगलच ट्रोल केलं जात आहे. आणि शरद पवारच कसे या स्टेडियमचे प्रणेते आहेत याचे दाखले दिले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर सोलापुरातील विविध राजकीय नेत्यांचे काय म्हणणे आहे याबाबतचा एक आढावा.

पूर्णचंद्र पंजाला सोलापूरचे माजी महापौर यांना या प्रकरणावर विचारणा केली असता ते म्हणाले कि, ”1972 ला बॅरिस्टर शेषेराव वानखेडे हे क्रीडा व अर्थ मंत्री होते तेंव्हा शरद पवारांकडे क्रीडा राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याच पालमंत्री पद होत. तेव्हा पवारांच्या संकल्पनेतून याची सुरुवात झाली मात्र पवारांनी सुरुवात केली म्हणून त्याच पूर्ण श्रेय त्यांना घेता येणार नाही असं त्यावेळेसचे सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांचा दावा आहे.”

जगदीश पाटील सोलापूर मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते ते मात्र या स्टेडियम उभारणीचे श्रेय पवारांना देतात. ते म्हणतात कि, ‘वरकरणी भाजपवाले स्टेडियम बाबत पवारांचं श्रेय जरी नाकारत असले तरी नकळतपणे तेही या स्टेडियम उभारणीला पवारांचाच हातभार आहे हे मान्य करतायत.”

जिल्ह्यातील खेळाडू आणि २०१९ चे छत्रपती पुरस्कार विजेता महेश गादेकर यांचे मत जाणून घेताना त्यांनी सांगितले कि, ”एकूण चार टप्प्यांमध्ये या स्टेडियमच काम होणं अपेक्षित होत त्यातील तीन टप्प्यांच काम शरद पवार पालमंत्री, मुख्यमंत्री आणि नंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना झालं होत, आमच्या पडताळणीत या स्टेडियम उभारणीपासून नंतर त्याला निधी उपलब्ध करून देण्यामध्ये शरद पवारांचा मोठा वाटा असल्याच शेवटी सिद्ध झालंय. आता प्रतीक्षा आहे ती इंदिरा गांधी स्टेडियमच उर्वरित बांधकाम पूर्ण होण्याची.”

Leave a Comment