नवी दिल्ली | ट्रक चालक आणि ट्रान्सस्पोर्ट कंपन्यांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हणले आहे. ट्रान्सस्पोर्ट कंपन्याच्या संपामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.
ट्रान्सस्पोर्ट कंपन्यांनी त्याच्या प्रमुख मागण्या माध्यमांच्या समोर ठेवल्या आहेत.
त्यावर एक दृष्टीक्षेप
१.डिझेलच्या किंमती कमी कराव्यात.
२.पूर्ण देशभर डिझेलची एकच किंमत असावी.३.देशभर पोलीस आणि आर टी ओ कडून होणारी पिळवणूक थांबवावी.
४.देशातील महामार्ग टोल मुक्त करण्यात यावेत.
या मागण्यासाठी सरकारला धारेवर धरण्याचा ट्रान्सस्पोर्ट कंपन्यांचा मनसुबा आहे.महाराष्ट्रात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन आणि दूध दरवाढ आंदोलन सुरू असतात. हे नवे आंदोलन सरकारचे कंबरडे मोडणार असे दिसते आहे