उल्हासनगरमध्ये वृद्धाने स्वतः भरले रस्त्यावरील खड्डे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | उल्हासनगरमध्ये रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून, हे खड्डे भरण्यास उल्हासनगर महानगरपालिका असमर्थ असल्याने येथील एका वृद्ध व्यक्तीने स्वतः हे खड्डे भरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेव्हा महापालिकेला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे असं ठाणेकर म्हणत आहेत.

या व्हिडिओ मध्ये कैलास कॉलनी परिसरात हातगाडीवर विटांचा चुरा आणून रस्त्यावरील खडे भरताना हा वृद्ध व्यक्ती दिसत आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून आता उल्हासनगर महानगरपालिकेला हा व्हिडीओ पाहून तरी लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. महापालिकेने खरे तर पाठीमागेच रस्त्यावरील खड्डे भरायला पाहिजे होते. परंतु खड्डे आणि रस्ते हे अविभाज्य समीकरण असून खड्ड्यांशिवाय कंत्राटदार आणि नगरसेवकांना मलिदा मिळत नाही असा पूर्व इतिहास आहे. असं असून देखील मुंबई, ठाण्यात रस्त्यावर पडलेले खड्डे वेळोवेळी निदर्शनास आणून देखील त्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा पूर्वानुभव आहे.

याच गोष्टीला कंटाळून नागरिकच पुढाकार घेऊन खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करतात. मागच्याचवर्षी मुंबईतील खड्ड्यांवर आणि त्यात साठणाऱ्या पाण्यावर भाष्य करणारं आरजे मलिष्काचं गाणं तुफान वायरल झालं होत. त्याला शिवसेनेनं प्रतिक्रियाही दिली होती. परंतु खड्ड्यांच वास्तव त्यांना मिटवता आलेलं नाही.

 

Leave a Comment