उषा काशीद, उषा काजळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी | बीड जिल्ह्यातील गेवराई येथे शिक्षक दिनाच्या पूर्व संधेला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून IESA संघटनेतर्फे उकृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यात गेवराई तालुक्यतील सावरगाव येथील व्हॅली व्हिव इंटरनेशनल स्कुलच्या शिक्षिका उषा काशीद आणि उषा काजळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काने सन्मानित करण्यात आले.

The cambrige valley school यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा पुरस्कार प्रदान सोहळा बीड जिल्ह्यातील गेवराई येथे संपन्न झाला. यावेळी IESA राज्य सेक्रटरी निखिल वाघमारे, भारती बांगर, गोपाळ शर्मा, श्रीमंत सानप, विजयश्री दराडे आदी उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यात ३६ शाळांपैकी २३ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यात व्हॅली व्हिव इंटरनेशनल स्कुलच्या शिक्षिका उषा काशीद आणि उषा काजळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शाळेच्या संचालिका विजयश्री दराडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून परिसरातही त्यांचं कौतुक होत आहे.

Leave a Comment