एकनाथ खडसे यांचा प्रभाव कायम, मुक्ताईनगर नगरपरिषदेत निर्विवाद बहुमत

thumbnail 1532068276169
thumbnail 1532068276169
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुक्ताईनगर | एकनाथ खडसेंचा प्रभाव त्यांच्या मतदार संघात कायम आहे याची पोच पावती मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीने दिली आहे. १७ जागा असणाऱ्या नगरपरिषदेत भाजपाने १३ जागा जिंकल्या असून कॉग्रेस राष्ट्रवादीला खाते उघडणे ही शक्य झाले नाही. तीन जागी शिवसेना विजयी झाली आहे तर एक जागी अपक्षाने बाजी मारली आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी १ हजार १८० मताने विजयी झाल्या आहेत.
भष्टाचाराचे आरोपात खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. भ्रष्टाचाराचे आरोप होऊन मानहानी झाली असली तरी जनतेत खडसे यांची प्रतिमा उज्वल असल्याचे खडसे यांनी या निवडणुकीतून सिद्ध केले आहे.