एका ट्वीटने गंभीरनं केली आफ्रिदीची बोलती बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 टीम, HELLO महाराष्ट्र | भाजपचे खासदार आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा भिडले आहेत. कलम 370 रद्द झाल्यानंतर आफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान करण्यास सुरुवात केली. त्यामुळं या आधी गौतम गंभीरनं फैलावर घेतल्यानंतर आता पुन्हा या दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.

अफ्रिदीनं बॉर्डरवर जात काश्मीरमधल्या नागरिकांसाठी काम करणार असल्याचे ट्वीट केले होते. यावर गंभीरनं आफ्रिदीवर पलटवार करत, लहान मुलांची पुस्तक तुझ्यासाठी मागवू का, असा मजेशीर सवाल केला. गंभीरनं, “मित्रांनो, या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदी स्वत: आफ्रिदीला विचारत आहे की, आफ्रिदीला लाज वाटेल असे काम आफ्रिदीला का करायचे आहे.

 

आफ्रिदीनं परिपक्व होण्यासाठी आता कायमचा नकार दिला आहे की काय असं वाटत आहे. त्यामुळं आता आफ्रिदीसाठी ऑनलाईन किंडरगार्डनची पुस्तके मागवणार आहे”, असे मिश्किल ट्वीट केले.बुधवारी आफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर एक वादग्रस्त ट्वीट केले. दरम्यान आफ्रिदीनं पाकिस्तानी जनतेला, “पंतप्रधान इमरान यांनी सुरू केलेल्या ‘काश्मीर तास’ या कार्यक्रमाशी जोडले जाण्याची विनंती केली होती. आफ्रिदीनं याबाबत आपण पीओके आणि बॉर्डरवर उपस्थित राहणार आहे”, असे ट्वीट केले. या ट्वीटवर गौतम गंभीरनं आफ्रिदीची शाळा घेतली. दरम्यान गौतम गंभीर च्या या ट्विट ला आफ्रिदी कडून काय उत्तर मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Comment