एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 1 जानेवारीपासून नवीन नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे. एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ही नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून अंमलात येईल. त्याअंतर्गत सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेकडे असणाऱ्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांना लागू असेल. एसबीआयने हे ट्विट केले आहे.

असे कार्य करेल

एसबीआयच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी, ओटीपी बँकेकडे नोंदणीकृत आपल्या मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. हे केवळ एका व्यवहारावर कार्य करेल. ही नवीन प्रणाली कॅश काढण्याच्या सद्य प्रक्रियेवर परिणाम करणार नाही. ही प्रक्रिया इतर कोणत्याही बँकेच्या एटीएमवर चालणार नाही कारण ती सध्या राष्ट्रीय वित्तीय स्विचमध्ये तयार केलेली नाही. यामुळे बनावट कार्डांवरील अवैध व्यवहार रोखू शकतील असे बँकेचे म्हणणे आहे.

Leave a Comment