करोनाच्या लढ्यात रेल्वे सज्ज; ट्रेनमध्येच तयार केले आयसोलेशन वॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अगोदरच ताण आहे. त्यामुळं जर कोरोना देशातील ग्रामीण भागात किंवा ज्या भागात रुग्णालयाची संख्या कमी आहे अशा ठिकाणी पसरला तर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारने भारतीय रेल्वेला तयार राहण्यास सांगितलं होत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यासाठी आयसोलेशन वॉर्डची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन रेल्वेने अफलातून आयडिया लढवत उभ्या असलेल्या कोचमध्येच आयसोलेशन वॉर्ड निर्मिती करण्याची सुरुवात केली आहे.

रेल्वेने बिगर एसी कोचला आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरित केलं आहे. सुसज्ज आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी रेल्वेने मधला बर्थ काढून टाकला आहे. तर रुग्णाच्या समोरील तीनही बर्थ आणि वर चढण्याची शिडीही काढून टाकली आहे. ट्रेनमधील बाथरुम आणि इतर सुविधा सुसज्ज करण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून वैद्यकीय सुविधांसाठी २२० व्होल्टची इलेक्ट्रिसिटीही दिली जाणार आहे.

सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या आयसोलेशन वॉर्डचा वापर झाल्यानंतर प्रत्येक रेल्वे विभागाकडून दर आठवड्याला १० कोचची निर्मिती केली जाईल, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. रेल्वेकडून तयार करण्यात आलेली ही आयसोलेशन वॉर्ड सुविधा देशातील ज्या भागात रुग्णालयांची कमतरता आहे, त्या भागाला पुरवली जाईल, असं इशान्य रेल्वे विभागाने कळवलं.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment