काँग्रेसच्या विजयासाठी निर्धाराने कामाला लागा : विशाल पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। निवडणुकीत दादा घराण्यातील उमेदवाराने उभे रहावेत, असे आदेश दादाप्रेमी कार्यकर्त्यांनी दिले पाहिजेत, लोकसभेच्या निवडणुकीत हीच अडचण झाली होती. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही. कार्यकर्त्यांनी आता नकारात्मक विचार बंद करून सकारात्मक विचार करावा आणि कॉंग्रेसच्या प्रचारासाठी कामाला लागावे, असे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष वसंतदादा पाटील यांनी केले.

विष्णू अण्णा भवनवर दादा व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विशाल पाटील बोलत होते. बैठकीला माजी महापौर किशोर जामदार, हारूण शिकलगार, किशोर शहा, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सिकंदर जमादार, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले, जयश्रीताई पाटील राजकारणात इच्छूक नव्हत्या. मात्र कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी व आनंदासाठी त्या राजकारणात वहिनी म्हणून आहेत. आपला गट वाऱ्यावर जाऊ नये म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत. यासाठी जयश्रीताईंच्या निरोपाची वाट बघत बसण्याची गरज नाही. लोकसभेच्या निवडणुकीत हीच अडचण झाली होती. तुम्ही आम्हाला सांगा लढा म्हणून आम्ही लढतो, घरी बसा म्हणून सांगा घरी बसतो. फक्त जबाबदारी आमच्यावर आहे असे समजू नका, निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत कोण इच्छूक आहेत. ते बाजुला ठेवावे. जयश्रीताई पाटील आपल्या उमेदवार आहेत. हे लक्षात ठेवावे. लढायचे ठरले आहे. त्यामुळे दिल्लीपर्यंत आपला आवाज पोहचणार आहे. निवडणुकीत आता कार्यकर्त्यांनी नकारात्मकपणा सोडला पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. वसंतदादांच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्ष जिवंत ठेवला आहे. पण काही जण पक्ष जिवंत ठेवला म्हणून सांगत आहेत. हे चुकीचे आहे, शहरात डिजीटल पोस्टर लावून व चार बातम्या वृत्तपत्रात देऊन पक्ष टिकत नसतो हे ज्यावेळी कळेल, त्यावेळी पक्ष वाढेल, असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment