पुणे : “काश तो दिवस पुन्हा यावा की हिंदू आणि मुसलमान यांच्यातील भिन्नपणा ओळखताच येणार नाही” असे मत सिनेअभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे. “हमिद – द अनसंग ह्युमनिस्ट” या ज्योती सुभाष दिग्दर्शीत माहीतीपटाच्या प्रदर्शन कार्यमात ते बोलत होते. “हमिद” हा माहीतीपट मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक हमिद दलवाई यांच्या जीवनावर आधारीत असून त्यामधे अमृता सुभाष, क्षितिज दाते, हमिद दाभोळकर आदींनी काम केले आहे. अलीकडील काही वर्षांत भारतीय समाजात धर्मांदता मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. पूर्वी महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि बंगाल आदी राज्यांमधे हींदू – मुस्लिम यांच्यातला फरकही लक्षात येत नव्हता. लोकांना पाहून त्यांच्यातील कोण हिंदू आहे आणि कोण मुसलमान आहे हे कळणे मुश्कील जायचे. त्यांच्या बाह्यरुपावरुन त्यांचा धर्म कोणता ते समजायचे नाही. त्यांच्यातले वेगळेपण त्यांच्या चालण्या-बोलण्यातून दिसून यायचे नाही. मात्र अलीकडच्या काळात धार्मिक ओळखेला महत्व दिले जात असल्याने आणि रिलीजिअस आयडेंटीटीमुळे हिंदू – मुस्लिम यांतील फरक एकानजरेत जाणवू लागला आहे असे मत नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले. “पुर्वीचे ते दिवस पुन्हा यावेत आणि हिंदू – मुस्लिम यांतील फरक ओळखताच येऊ नये..सर्वजण एक भाषा, एक पेहराव मधे गुण्यागोविंदाने रहावेत” अशी इच्छाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.