कृणाल पंड्याची फिल्मी लव्हस्टोरी; मुंबई इंडियन्सच्या अख्ख्या टीमसमोर IPL फायनल दिवशी केलं प्रपोज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडिअन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या मुंबईसाठी कायमच एक महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. कृणालने जरी आपला भाऊ हार्दिकच्या नंतर संघात स्थान मिळवलं असलं, तरी त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे.कृणालसाठी भारतीय संघाचे दरवाजे २०१७ च्या IPL फायनलनंतर उघडले. मुंबई इंडियन्सने तो हंगाम जिंकला होता तेव्हा कृणाल अंतिम सामन्याचा मानकरी होता.

IPL फायनलच्या रात्रीच त्याने आपला आयुष्याचा जोडीदार निवडला आणि गर्लफ्रेंड पंखुडीला प्रपोज केलं.कृणाल आणि पंखुडी यांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे चांगले मित्र झाले.त्यानंतर दुखपतीवर उपचार घेण्यासाठी बराच काळ कृणाल मुंबईमध्येच होता, त्या काळात त्याची पंखुडीशी ओळख वाढली. दोघांमधील गाठीभेटी वाढल्या आणि ते एकमेकांना डेट करू लागले.

पंखुडीचे कुटुंब मुंबईत राहते. तिचे वडील राकेश शर्मा हे उद्योगपती आहेत. आई अनुपमा शर्मा गोव्यात इंटेरियर डिझायनर आहे. पंखुडीला मोठी बहीण आहे. कृणाल स्वतःची लव्ह स्टोरी सांगताना म्हणाला होता, “पंखुडी माझी चांगली मैत्रीण होती. आम्ही दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो.”

“मुंबईने फायनल जिंकली आणि मला सामनावीर घोषित केले त्यानंतर मी तिला प्रपोज करण्याचा विचार केला. मी जेव्हा तिला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा तिने लगेच मला होकार दिला”, असं कृणालने सांगितलं.