केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी – संजय राऊतांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये केली आहे.

काल राज्यसभेमध्ये कोरोनाचा साथीच्या नियंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत सहभागी झालेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. तसेच महाराष्ट्राला पीएम केअरमधून निधी देण्यात यावा अशी मागणी केली. त्याबरोबरच केंद्र सरकारकडे थकीत असलेला राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारने लवकरात लवकर द्यावा तसेच कोरोनाविरोधातील लढाईत कुणीही राजकारण आणू नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

आजच्या सामना अग्रलेखात शिवसेनेने केंद्र सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. देशावर आर्थिक संकट कोसळले आहे आणि केंद्र सरकारने सरळसरळ हात झटकले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याराज्यात जे संकट निर्माण झाले आहे, ते मुख्यत्वेकरून कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात अशी मदत गुजरातला केली होती. केंद्राकडे स्वत:ची महसुली उत्पन्नाची साधने कमी आहेत. राज्यांनी दिलेल्या महसुलावर केंद्राचे दुकान चालते.अस सामना अग्रलेखात म्हणलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment