पुणे | केसरीवाडा चा गणपती हा पुण्यातील मानाचा पाचवा गणपती आहे. मानाचा पाचवा केसरी गणपतीची स्थापना लोकमान्य टिळक यांनी १८९४ मध्ये विंचूरकर वाड्यात केली. तर १९०५ पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा गणेशोत्सव सुरू झाला. या उत्सवामध्ये लोकमान्य टिळक त्यांच्या व्याख्यान्यातून समाजप्रबोधनाचे काम करत होते. १९९८ साली संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेल्या वर्णणाप्रमाणे केसरी गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली. शेला, दागिणे, प्रतिके, मुकुंट, गंडस्थळ हे या मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत. दरम्यान, केसरी गणपतीचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून, संस्थेचे सरव्यवस्थापक विश्वस्त डॉ. रोहीत दीपक टिळक यांच्या हस्ते गुरूवारी (दि. १३) सकाळी साडेअकरा वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
यंदाचे वेळापत्रक –
प्रतिष्ठापना मिरवणूक : स. १० वा. गोखले यांच्याकडील श्रींची मूर्ती पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणुकीने पालखीतून टिळक वाड्यात आणण्यात येईल.
सहभाग : श्रीराम आणि शिवमुद्रा ढोलताशा पथक, बिडवे बंधूंचे नगारावादन. शहापूरकर यांच्याद्वारे सभामंडपात आकर्षक रांगोळ.
‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा : स. ११.३० वाजता डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते.