केसांसाठी रात्रभर लावून ठेवा हे हेअर मास्क ; होईल ‘अशा’ प्रकारे जबरदस्त फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक स्त्रिया ला आपले केस मोठे , नितळ आणि घनदाट असावे असे वाटत असते. पण अनेक वेळा केसांच्या चुकीच्या ट्रीटमेंट मुळे केस गळती चे प्रमाण वाढते. तसेच स्त्रियांचे सौदंर्य हे मोठ्या केसांमध्ये जास्त प्रमाणात असते. असे म्हंटले जाते. केस घनदाट आणि काळेशार असतील तर प्रत्येकाचीच नजर आपल्याकडे आपोआप वळते. पण धूळ, माती, प्रदूषणामुळे आपल्या केसांवर दुष्परिणाम होऊ लागतात. तसंच केसांच्या देखभालीकडे वेळ दिला नाही तरीही तुमच्या त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यासाठी तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त महागडी ट्रीटमेंट करता. पण त्याचा पण चांगला परिणाम आपल्या केसांवर काही वेळेला होत नाही.

केस गळतीचे प्रमाण होण्यासाठी हे धोके टाळण्यासाठी केसांसाठी घरगुती उपाय करून पाहा. घरगुती हेअर मास्क आपल्या केसांना रात्रभर लावून ठेवा. यामुळे तुमच्या निर्जीव झालेल्या केसांमध्ये जीव येईल. आणि हे केस पुन्हा वाढण्यास मदत होते. हे हेअर मास्क चार सामग्रींपासून तयार केलं जाते.

​ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचा योग्य पद्धतीनं वापर केल्यास आपल्या केसांशी संबंधित बहुतांश समस्या कमी होण्यास मदत मिळेल. ऑलिव्ह ऑइलमधील पोषण तत्त्वांमुळे आपले केस मऊ होण्यास मदत मिळते. यामुळे कोरडे केस आणि आपल्या टाळूला पोषक घटकांचा पुरवठा होतो. ऑलिव्ह ऑइलमधील पोषक तत्त्वे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. यामुळे निस्तेज आणि खराब झालेल्या केसांची समस्या कमी होऊन, केसांवर चमक येते.

असे तयार करा त्याची पेस्ट
ही सर्व सामग्री एकत्र घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा. तीस मिनिटांसाठी हेअर मास्क राहू द्यावे किंवा तुम्ही रात्रभर देखील हे मास्क लावून ठेवू शकता. यासाठी शॉवर कॅपचा वापर करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पू आणि थंड पाण्यानं केस धुवावे.

Leave a Comment