नवी दिल्ली | कॉग्रेसने भाजपच्या विरोधात रान पेटवले असतानाच भाजप सरकारच्या लोकसभेच्या सदस्य संख्येत घट झाल्याने कॉग्रेसने भाजपवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. आज सकाळी ११ वाजता संसदेचे अधिवेधन सुरू झाले. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडले. त्यानंतर प्रश्न उत्तराचा तास सुरू झाला. कॉग्रेसने त्या तासाच्या दरम्यान आम्हाला न्याय पाहिजे अशा इंग्रजीतून घोषणा द्यायला सुरुवात केली.
प्रश्न उत्तराच्या तासानंतर लक्षवेधी प्रस्ताव मांडले जाऊ लागले. त्यावर ही कॉग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरोप केला की, सभापतीजी भाजपचे प्रस्ताव अगोदर का घेतले जात आहेत. त्यावर सभापतींनी स्पष्टीकरण दिल्यावर खर्गे शांत झाले.
संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत कॉग्रेसला चेतावणी देत सभापतींना अविश्वास प्रस्तावावर चर्चा घ्यावी असे म्हणले. आज कळू द्या की मोदींच्या मागे किती शक्ती आहे. परंतु सभापतींनी ठरलेल्या वेळेतच प्रस्तावावर चर्चा घेतली जाईल असे सदनात स्पष्ट केले.
कॉग्रेसने आखलेल्या अविश्वास प्रस्तावाला तेलगू देशम पार्टीचा पाठिंबा आहे. तसेच भाजपाच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा चंग कॉग्रेसने बांधला आहे. अर्थात हा प्रस्ताव संम्मत होण्याबद्दल खात्री लायक विधान करता येणार नाही.