कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३०ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्यामुळे यंदाचा गणेशउत्सव कोकणात आपल्या घरी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे.
गणेशोत्सवानिमित्त रस्ते वाहतुकीचा आढावा पाटील यांनी एका बैठकीत घेतला. विनोद तावडे, आशिष शेलार, रवींद्र वायकर, दीपक केसरकर हे मंत्री तसेच आ. वैभव नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते चांगले करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ते तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जात असतात.

त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येईल.पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरू असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Leave a Comment