कोरोनाचा झटका, गुंतवणूकदारांना ६.२५ लाख कोटींचा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ‘कोविड-१९’मुळे जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. आज सोमवारी गुंतवणूकदारांना ६.२५ लाख कोटींचा फटका बसला.

मुंबई शेअर बाजारात आज सोमवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २ हजार १८२ अंकांनी कोसळला. अर्थव्यवस्थेवरील ‘कोविड-१९’चे सावट आणखी दाट होण्याची भीती गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेअरविक्री करण्यावर त्यांनी भर दिला. इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेचे समभाग ९.३ टक्क्यापर्यंत गडगडले. प्रचंड दबदबा असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या भांडवल मूल्यामध्ये ६.२५ लाख कोटी रुपयांची घसरण झाली. प्रारंभीच्या सत्रात आज ही जबरदस्त घसरण झाली.

शुक्रवारीही मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती, हे येथे उल्लेखनीय.

Leave a Comment