सोलापूर प्रतिनिधी । कोरोना’ने भारतात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकापर्यंत माहिती पोचावी म्हणून फोनवर डायलर टोन वाजत आहेत. मात्र, या डायलर टोन हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. अनेकांना काय सांगितले जात आहे, हेच समजत नाही. त्यामुळे मराठी सक्तीसाठी आंदोलन करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता यावर आक्रमक होणार आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही हात पाय पसरायला सुरवात केली आहे. दररोज “कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यामुळे प्रशासनही प्रतिबंधक उपाय म्हणून वेगवेगळे निर्णय घेत आहे. याबाबत जागृतीही केली जात आहे. त्यामुळे “कोरोना’ने भारतात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकापर्यंत माहिती पोचावी म्हणून फोनवर डायलर टोन वाजत आहेत. मात्र, या डायलर टोन हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे ही डायलर टोन मराठीतच हवी, या मागणीसाठी आता मनसे पाऊल उचलणार आहे.
चीन येथून सुरू झालेला कोरोना बाहेरच्या देशातही पसरला आहे. भारतात त्याचे रुग्ण आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्रात पुणे येथे रुग्ण आढळला. त्यानंतर मुंबई, नगर या शहरातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई यासह काही जिल्ह्यांत सरकारने उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून नागरिकांनी घाबरून न जाता काय काळजी घ्यावी याबाबत सरकारकडून जागृती केली जात आहे. रेल्वेसह सार्वजनिक ठिकाणी याबाबत जागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.