नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीच्या संसर्गाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. दर दिवशी ९० हजारांच्या वर कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवणं दिवसेंदिवस कठीण गेल्या २४ तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. तर देशात १ हजार २०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या २४ तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.