हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे . अनेक पर्यावरण वादी लोक आहेत . कि ते झाडांवर प्रचंड प्रेम करतात . स्वतःच एक घर बनवायचं म्हंटल तरी कितीतरी झाडे तोडावी लागतात. तेव्हा कुठेतरी छोटासा सिमेंट च जंगल तयार होत. आणि सोबत छोटासा गार्डन तयार केलं जात . एक झाड तोडल्यामुळे अनेक जीवांचं नुकसान होत. पण असा विचार कोणी करताना दिसत नाही. योगेश केसवानी हा असा व्यक्ती आहे कि १५० वर्षे जुने असलेले वडाचे झाड न तोडता त्याने आपलं घर तयार केलं आहे.
मध्यप्रदेश मधील जबलपूर भागात योगेश केसरवाणी यांचा परिवार राहतो. त्यांच्या वडिलांनी जागा घेतली होती त्या भागात एक वडाचे झाड होते. १५० वर्षे जुने असललेल वडाचं झाड न तोडता घर बांधण्याचा विचार त्यांनी केलं होता. परंतु असा एकही इंजिनिअर त्यांना मिळत नव्हता कि तो झाड न तोडता घराचे बांधकाम करून देईल मोट्या मुश्किलीने एक इंजिनिअर त्यांना भेटला. त्याने बांधकाम करू असं म्हंटलं आणि त्यानंतर त्याचा प्लॅन बघून सर्वजण हसू लागले . त्यानंतर दोन वर्षानंतर दोन मजली घर बांधले गेले. त्यानंतर मात्र घराच्या आजूबाजूला गार्डन करता आलं नाही . पण त्याची कोणतीही उणीव भासली नाही. जेव्हा घर तयार झालं तेव्हा सगळे आम्हाला चिडवायचे पण त्यानंतर सर्वजण असा प्लॅन बघून कौतुक करायला लागले. तसेच अनेक बाहेरचे इंजिनीअर सुद्धा घराचा प्लॅन बघायला येतात. एक वडाचे झाड हे दहा पुत्रांच्या बरोबरीचे आहे. असे योगेश सांगतात.

घर तयार झाल्यानंतर काही वेळा अनेक वडाच्या फ़ांद्या येऊ लागल्या त्यासाठी खिडकी चा उपयोग होऊ लागला पण त्यामुळे अनोख्या पद्धतीचे घर लोकांना दिसू लागले या वडाच्या झाडाची पूजा त्यांची आई दररोज न चुकता करते. या झाडामुळे त्यांना घरात वावरताना कोणताही त्रास होत नाही. त्यांच्या घरातील अनेक लहान मूल या झाडाच्या फांद्यावर खेळतात. इतकंच काय झाडाच्या उंचीला काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी घराच्या छतावर वेगळी सोय केली आहे.