गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी ।  गणेश उत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळांची लगबग सुरु आहे. यंदाच्या गणेश उत्सवाला तर गणेश मंडळांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण यंदा गणेशउत्सवासाठी महावितरणकडून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रति युनिट वीजदराने तात्पुरती वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असे वीजदर आहेत. परिणामी, अधिक वीज वापरली, तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतीयुनिट एवढाच दर आकारण्यात येईल. मंडळांना प्राधान्याने वीजजोडणीसाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती, मोबाइल क्रमांक देणे गरजेचे आहे. वीजजोडणी, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. महावितरणचे अभियंता यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावेत. आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

हे पण वाचा –

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

बाबसाहेब आणि संघ प्रमुखांचे विचार सारखेच : चंद्रकांत पाटील

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणतात

Leave a Comment