नवी दिल्ली | कॉग्रेसचे राज्यभेचे नेते गुलाम नबी आजाद यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत विरोधकांची बैठक होणार असल्याची माहीती आहे. १८ जुलै पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी आजाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदर बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कॉग्रेसचे प्रमुख नेते आणि त्यांच्या मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचे हे शेवटून तिसरे अधिवेशन आहे. लोकमानसात कॉग्रेसच्या बाजूने मतजागृती करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाकडे पाहिले जाते. तसेच पी.जे कुरियन राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्याने त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला कसे सामोरे जायचे या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दृष्टीने आज सकाळीच कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी कॉग्रेस नेत्यांची एक बैठक पार पडली आहे. सामोहिक हत्या, शेतकऱ्यांच्या समस्या, बँकांचे भ्रष्टाचार आणि महिलांच्या अत्याचारात झालेली वाढ या विषयावर सरकारला घेरण्याची कॉग्रेस तयार करत आहे.