मुंबई | वीस वर्षांपूर्वी शिवसेनेने सम्मत केलेल्या गोहत्या बंदी विधेयकाला भाजपने हवा भरली आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची स्वाक्षरी घेऊन गोरक्षेचा कायदा बनवला. कायद्यामधे गोसेवा प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद नमुद करण्यात आली आहे. त्याच अन्वये पुण्यामधे गोसेवा प्राधिकरण स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
पुण्यामध्ये गोसेवा आयोग स्थापन करण्यात येईल आणि तो आयोग भाकड गाईच्या संगोपनाचे उपाय सुचवेल अशी माहिती पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितली आहे. भाकड गाईचा प्रश्न भीषण होत चालला असून यावर उपाय करणे गरजेचे आहे. म्हणूनच सरकारकडून ही पावले उचलण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.