‘ग’ म्हणजे गणेशगल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | मुंबईत गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम असते. मोठ मोठे देखावे तसेच देखण्या मुर्ती अशी मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. त्यापैकीच एक म्हणजे गणेशगल्लीचा राजा. मुंबईचा राजा अशी गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. गणेश गल्लीत दरवर्षी वेगळा देखावा सादर केला जातो. मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. आता अवघ्या काही दिवसातच गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे आपण या गणेश गल्ली गणपतीबद्दल जाणून घेऊया.

‘लालबागचा राजा’ आणि ‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेला गणेशगल्लीचा गणपती, हे दोन नामवंत गणपती याच भागात असल्याने मुंबईकरांचीच नाही, तर राज्यभरातील भाविकांची पावले लालबागच्या गल्ल्यांकडे वळतात. या भागातील सर्वात जुने मंडळ असा लौकीक असलेला गणेशगल्लीचा गणपती हा सर्वार्थाने मुंबईचा राजा आहे. मध्य रेल्वेच्या दैनंदिन कामकाजात एरवी फारशी महत्त्वाची न मानली जाणारी करी रोड व चिंचपोकळी ही स्थानके गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मात्र ओसंडून वाहत असतात. लालबागच्या पट्टय़ातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, त्यांच्या गणेशमूर्ती, आरास यांच्याबाबत नेहमीच मुंबईकरांच्या मनात आकर्षण असते.

लालबागमधील या सर्वात जुन्या मंडळाने भव्यतेची परंपरा सांभाळताना सामाजिक भानही जपले आहे. गणेश गल्ली मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ग्रामीण आरोग्य शिबीर, नेत्रचिकित्सा शिबीर असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे या गणपतीला समाजभान जपणारा गणपती असे म्हंटले जाते.

Leave a Comment