कल्याण |रस्त्यांवरील खड्यांमुळे होणार्या अपघातांची संख्या येत्या काही दिवसांत वाढली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्यांमधे गाडी गेल्याने ताबा सुटून अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला अाहे. त्यामुलळे ‘रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा करणाऱ्या चंद्रकांत दादांना सामान्य माणसे प्रश्न विचारू लागली आहेत. ‘तुम्ही अजून किती जणांचे बळी घेतल्यावर खड्डे बुजवणार आहात’ असा सवाल राज्याचे सार्वजणीक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील याना जनता विचारत आहे.
आज सकाळीच कल्याणच्या गांधारी पुलावर कल्पेश जाधव या तरुणाची गाडी खड्ड्यात घसरली. मागून येणाऱ्या टेम्पोने त्याला चिरडले आहे. या महिन्यात कल्याण परिसरात घडलेली ही तिसरी घटना आहे. वारंवार होणार्या अपघातांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. गेल्या शनिवारी ७ जुलै रोजी मनीषा बोहिर यांची गाडी खड्ड्यात घसरल्याने मागून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या देहाला चिरडून टाकले होते. खड्ड्यामुळे अपघात होण्याची प्रकरणे फक्त कल्याण मध्ये घडत नसून राज्याच्या अनेक भागात असे अपघात घडत आहेत. खड्ड्यांमुळे घडणाऱ्या अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी कोणी तरी नेत्याने पुढे यावे असा सवाल प्रसार माध्यमांनी विचारला आहे.