चंद्रपुरात भर दिवसा वाघांचा संचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपुर प्रतिनिधी | चंद्रपूर शहरालगत पद्मापुर येथील खुल्या कोळसा खाणीत वाघ संचार करत असल्याचे आढळून आले आहे. कोळसा खाण क्र. 3 च्या झुडुपात वाघाचे अस्तित्व असल्याची माहिती वनक्षेत्ररक्षकांना मिळाली होती. चंद्रपूरमध्ये खुल्या कोळसा खाणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून आहेत. त्यामुळे या भागात वन्यजीवांचे सातत्याने वास्तव्य असते.

अनेकदा या ठिकाणचे वाघ मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वन अधिकाऱ्यांची एक तुकडी या भागात पहारा देण्यासाठी गेली असता या भागात वरचेवर वाघ संचार करत असल्याचे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. कोळसा खाण भागातील वाघ फिरण्याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे . दरम्यान या भागात कोणतीही जीवितहानी घडू नये यासाठी कोळसा खाण व्यवस्थापनाने सावधगिरीचे उपाय सुरू केले आहेत. खाण परिसरात काम करणाऱ्या लोकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment