औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढली असून ही संख्या 4929 वर पोहोचली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी कुपोषित बालकांची संख्या तीन हजाराच्या आसपास होती. मात्र यावर्षी या कुपोषित बालकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही संख्या का वाढत आहे? याला कारण काय? याचा कोणताही शोध जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला नाही. प्रत्येक तालुक्यात ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे.
त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यात 800, फुलंब्री तालुक्यात 284, सिल्लोड तालुक्यात 400, सोयगाव तालुक्यात 167, कन्नड तालुक्यात 700, खुलताबाद तालुक्यात 151, गंगापूर तालुक्यात 450, वैजापूर तालुक्यात 80 आणि पैठण तालुक्यात 708 अशी एकूण संख्या 4929 झाली आहे.
महिला बालकल्याण सभापती पदी अनुराधा चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. परंतु उपोषणामूळे मरण यातना भोगणाऱ्या हातपाय बारीक पडलेल्या, डोकं मोठे झालेल्या या बालकांना महिला व बालकल्याण सभापती अनुराधाताई यांनी बघितलं नाही का? असा प्रश्नही जिल्हा परिषदेत चर्चिला जात आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.