चित्रपट फ्लॉप झाला तर गावाकडे जाऊन शेती करणार – शर्मन जोशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | चित्रपट फ्लॉप झाला तर हे सर्व सोडून शेती करण्याचा विचार येतो, असं अभिनेता शर्मन जोशीने म्हटलं आहे. ‘गॉड मदर’, ‘लज्जा’, ‘स्टाइल’, ‘गोलमाल’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘थ्री इडियट्स’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता शर्मन जोशी सध्या बॉलिवूडच्या एखाद दुसऱ्या चित्रपटात पहायला मिळतोय.

शर्मन जोशी सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘बबलू बॅचलर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यानं अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली.

मिशन मंगल’ चालला नसता तर गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला होता, पण तो यशस्वी झाला आणि मी माझा निर्णय बदलला, असंही शर्मननं म्हटलं. दरम्यान, गेल्या वर्षांपासून शर्मनचे प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल दाखवू शकले नाहीत.