हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 आता दोन दिवसांवर आली आहे. त्यातच आयपीएलचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. “सलामीच्या सामन्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्स महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल.” अशी भविष्यवाणी टीम इंडियाच्या माजी सलामीवीर गौतम गंभीरने केली आहे.
गंभीर काय म्हणाला?
चेन्नईच्या संघात सुरेश रैनाचीही अनुपस्थिती चिंतेचा विषय असेल, तसेच मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांचा सामना करणं चेन्नई सुपर किंग्ज यांच्यासाठी कठीण असेल. अस मत गौतम गंभीरने व्यक्त केले.
बुमराह आणि बोल्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज आहेत. तसेच दोघे टी 20 प्रकारात विकेट घेण्यात निपुण आहेत. न्यूझीलंडचा डावखुरा गोलंदाज बोल्ट हा चेंडू स्विंग करण्यात माहीर आहे तर बुमराहचीही वेगळी शैली चेन्नईसाठी चिंतेची बाब असेल, असं गंभीरने स्पष्ट केलं.
सुरेश रैनाच्या जागी तिसऱ्या क्रमांकाची उणीव भरुन काढणं, हे चेन्नईसाठी आव्हानात्मक असल्याचं गंभीर म्हणाला. दुसरीकडे चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे शेन वॉटसनसोबत दुसरा कोणता खेळाडू सलामीला उतरेल आणि ही जोडी मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना कशी करेल, हे पाहणं औत्सुक्याचं असेल, असं गंभीरने सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’