चेन्नई विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी मुंबई सज्ज ; कर्णधार रोहित शर्माने फुकले आयपीएलचे रणशिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. 19 सप्टेंबरला हा सामना अबुधाबीत खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी सज्ज आहोत, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दिली आहे.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सर्व आव्हानांसाठी आम्ही सज्ज आहोत. चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलच्या इतिहासात यशस्वी संघ राहिला आहे. चेन्नईने 3 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे चेन्नईला हलक्यात घेऊन चालणार नाही. विजयी सुरुवात करण्याचा मानस प्रत्येक संघाचा असेल, असंही रोहित म्हणाला.चेन्नईमध्ये अनेक आक्रमक आणि दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे चेन्नईविरुद्धचा सामना चुरशीचा होईल, अशी आशा रोहितने व्यक्त केली आहे.

यूएईमधील खेळपट्ट्या फक्त फिरकीपटूंसाठीच नाहीतर वेगवान गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरतील. या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना रिव्हर्स स्वींगसाठी अनुकूल ठरतील, असा विश्वास रोहितने व्यक्त केला.मुंबई कडे क्रुणाल पांड्या, राहुल चहर, प्रिसं बलवंत राय आणि अनुकूल कॉय असा फिरकीपटूंचा ताफा आहे त्यामुळे या खेळाडूंकडून रोहितला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

मुंबई इंडिअन्स आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी तब्बल 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.रोहित शर्मा आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.यावर्षी पुन्हा एकदा मुंबईच्या चाहत्यांना पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment