जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली : भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मु – काश्मिरमधे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. भाजपने पी.डी.पी. चा पाठिंबा काढुन घेतल्याने मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष अल्पमतात आला होता. परिणामी मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. जम्मु काश्मिरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील इतर पक्षांसोबत सरकार स्थापणेबाबत चर्चा केली. परंतु कोणताही पक्ष पी.डी.पी. सोबत सत्ता स्थापण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले. परिणामी राज्यातील सद्य परिस्थितीबाबतचा अहवाल राज्यपाल वोहरा यांनी राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांना पाठवून दिला होता. जम्मु काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू करण्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींकडे शिफारसही केली होती. राष्ट्रपती कोविंद यांनी आज जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवटीस लागु करण्यास परवानगी दिली आहे. संविधानाच्या कलम ९२ नुसार जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

Leave a Comment