जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट? भाजप सत्तेतून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर : भाजपा जम्मु काश्मिरमधे सत्तेतून बाहेर पडली आहे. भारतीय जनता पक्षाने पी.डी.पी. ला असलेला आपला पाठींबा काढुन घेतला आहे. भाजप मुफ्ती सरकार मधून अचानक बाहेर पडल्याने जम्मु काश्मिरमधीर मुफ्ती सरकार कोसळणार आहे. आज संध्याकाळ पर्यंत मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील अशी शक्यता आहे. यामुळे जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमधे जम्मु काश्मिरच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडली. बैठकीमधे राज्यातील सद्यपरिस्थितीवर दिर्घ चर्चा झाली. बैठकीअंती मुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला. पी.डी.पी. सोबत युती करण्यामागे जे उद्देश होते ते पुर्ण होत नसल्याने आम्ही सरकारमधून बाहेर पडत आहोत असे राम माधव यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. जम्मु काश्मिरमधे शांतता नांदावी असा आमचा नेहमी प्रयत्न राहीला आहे परंतु एकहाती सत्त नसल्यामुळे भाजपाला राज्यात काम करताना अनेक अडचणी येत होत्या आणि त्यामुळेच पक्षाने हा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले.

मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, रायझींग काश्मिर वर्तमानपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या तसेच भारतीय सेनेचा जवान औरंगजेब याची हत्या आदी कारणांवरुन मोदी सरकारवर देशभरातून टिका होत होती. यातूनच भाजपाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. आता जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागु होणार की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment