जयंत सिन्हा यांनी दिले राहुल गांधींना ओपन चॅलेंच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हांवर वार केला होता. बीफ विक्रेत्याला मारहाण करुन ठार करणार्यांना सिन्हा यांनी हार घालून गौरवल्याबद्दल राहुल गांधींनी निषेध नोंदवला होता. हॉर्वर्ड यूनिवर्सिटीचा माजी विद्यार्थी असलेल्या जयंत सिन्हा यांच्या विरोधात दाखल केलेल्या ऑनलाईन खटल्याला आपले समर्थन द्या असे आवाहनही राहुल गांधींनी यावेळी केले होते.

झारखंड मधील रामगड शहरात २९ जून २०१७ रोजीअलीमुद्दीन अंसारी नावाच्या बीफ मटण विक्रेत्यास गोमांस विक्रीच्या संशयातून ११ इसमांनी बेदम मारले होते. त्यात त्या बीफ मटण विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील ११ पैकी ८ लोकांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अर्ज मंजूर झाल्याने त्यांची जामिनावर सुटका झाली आणि याच सुटलेल्या ८ लोकांना जयंत सिन्हांनी हार घालून गौरवले. या कथित प्रकारावर जयंत सिन्हा यांच्यावर सोशल मीडिया तसेच राजकीय वर्तुळात प्रचंड टीका झाली. या टीकेचा समाचार घेण्याच्या दृष्टीने जयंत सिन्हांनी राहुल गांधींना चर्चेचे ओपन चॅलेंच दिले आहे. ‘राहुल गांधींनी माझ्या शिक्षणाचा उल्लेख करून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली आहे त्यामुळे राहुल गांधीने माझ्याशी चर्चा करून माझे मुद्दे खोडून काढावे’ असे जयंत सिन्हा म्हणाले आहेत.

Leave a Comment