परभणी प्रतिनिधी | जिंतूर शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करीत असलेल्या एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील एका हॉटेलमध्ये तालुक्यातील संक्राळा येथील 30 वर्षीय भिमराव विठ्ठल वाकळे हा मागील काही महिन्यांपासून कामगार म्हणून काम करत होता.
मात्र शनिवार 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्याने बसस्थानक परिसरातील नदीच्या बाजूच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या झाडाला गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास त्याचा संशयास्पद मृतदेह नागरिकांना दिसल्यानंतर नागरिकांनी घटनेची माहिती जिंतूर पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. यावेळी मयत भिमराव वाकळे यांच्या नातेवाईकांनी सदरील घटना आत्महत्येची नसून घातपात आहे हे सांगून तब्बल तीन तास रुग्णालयात गोंधळ घातला. परिणामी शहरात या प्रकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. मृतास आई वडील भाऊ बहिण कोणचा नसल्याचे समजते.